सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करत त्यांना निलंबित करावे,अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे. स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे.