महावितरणने सांगली जिल्ह्यात जबरदस्तीने 'स्मार्ट मीटर' बसवले आहेत. या स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून महावितरण कार्यालय वर हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.