आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट आता सांगलीच्या एलपीजी गॅस दरावर झाला आहे. सांगली मिरज शहरात तीन गॅस पंप आहेत त्यातील एक पंप सध्या सुरू आहे. त्यामुळे या पंपावर रिक्षा चालकाने सकाळी सात वाजल्यापासून गर्दी केली आहे. तब्बल दीड ते दोन किलोमीटर रिक्षा चालकांच्या रांगा या ठिकाणी पहावयास मिळत आहेत.