सांगलीच्या इस्लामपूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव असून देखील तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या इस्लामपूर येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे.