सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी या शर्यतीचा फायनल राऊंड पार पडला. या नागोळेच्या मैदानात प्रथम क्रमांकसाठी रमेश खोत याचा सुलतान आणि राम्या या पिपळगावच्या बैल जोडीने मैदान मारले. सुलतान आणि राम्या हे ऐतिहासिक भव्य राज्यस्तरीय "देवाभाऊ केसरी" बैलगाडा शर्यतीचे पहिले मानकरी ठरले आहेत.