कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपटूंनी पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासली आहे.कृष्णामाई जलतरण सदस्य, डॉक्टर सरकार ग्रुप, कृष्णामाई स्वच्छता अभियान सदस्य श्रावणानिमित्त कृष्णा काठच्या जलतरणपटूसह एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत दरवर्षी पोहत जातात.