सांगली जिल्ह्यातील तासगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिनी बेदाणा विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन केले. अफगाणिस्तानमार्गे भारतात येणारा स्वस्त चिनी बेदाणा स्थानिक बाजारपेठेत विकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजवर धडक देत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.