बाळासाहेब ठाकरे चौक येथे शिवसेना (ठाकरे गट) सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार बाळ माने यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. कोकण विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत माजी आमदार बाळ माने यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधून तसेच त्यांच्या साडी नेसलेल्या आणि कुंकू लावलेल्या पोस्टरला चप्पल मारून जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करत निषेध आंदोलन केले आहे.