सांगली - चांदोली धरण परिसरात पावसाची उघडीप होताच वारणा नदीची पाणीपातळी घटू लागली. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेत घट झाली असून वारणा नदीची पाणीपातळीही हळूहळू कमी होऊ लागली आहे.