आखाती युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांसोबतच हळदीलाही बसला आहे. सांगलीच्या हळदीला जगभरात प्रचंड मागणी असते. त्याच बरोबर यंदा हळदीचे उत्पादनही चांगले झाले आहे. मात्र आखाती युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार साडेचौदा हजारापासून 24 हजारापर्यंतचा दर मिळत होता. पण आता हा दर प्रत्येक क्विंटल हजार ते बाराशे रुपयांनी उतरला आहे.