शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांना ब्लॅकमेल करून पक्ष फोडल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांनी सध्याचे राजकारण ब्लॅकमेलिंगचे असून, काही नेते स्वतःला न्यायाधीश किंवा तपास अधिकारी समजत असल्याचा प्रश्न उपस्थित केला.