संजय राऊत यांनी विरोधकांवर शिवसेना आणि मनसेला घाबरल्याचा आरोप केला आहे. मशाल आणि इंजिन या चिन्हांची भीती वाटत असल्याचे ते म्हणाले. पक्ष आणि चिन्ह चोरूनही लढत असल्याचा दावा करत, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पाठीमागून खंजीर खुपसण्याचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला.