शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत संबोधत, त्यांच्या अपहरणाचा आरोप केला आहे. राऊत यांनी अप्रत्यक्षपणे गुजरातकडे बोट दाखवत, त्यांना निर्लज्ज लोक आणि बकासुर असे संबोधले. महाराष्ट्रातील दैवते पळवून आनंद मिळवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.