शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर निवडीवर मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, आगामी निवडणुकीत शिंदे गटाचा महापौर होणार नाही. भाजपने मुंबईत महापौर बसवण्याचा दावा केला असला तरी, भाजप नव्हे तर गौतम अदानी मुंबईचा महापौर कोण असेल, हे ठरवतील, असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, महापौर निवडणे सोपे नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.