शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५-१० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. कल्याणमध्ये मनसेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना मोठी रक्कम देऊ केल्याचा दावा त्यांनी केला, तसेच जळगावमध्येही उमेदवारांच्या घरी ५ कोटींच्या बॅगा पोहोचल्याचे सांगितले.