संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे की, मनसे किंवा शिवसेनेच्या उमेदवारांना पोलीस घरातून पकडून एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आणत आहेत. पोलीस हे काम दबावाखाली करत असावेत, ज्यामुळे त्यांना आपल्या वर्दीची शान राखून हे करणे शक्य होत नाही, असेही राऊत म्हणाले.