शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे, माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं अशी भाजपची भूमिका असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. भाजपच्या या भूमिकेमुळेच आपण त्यांच्यापासून दूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.