संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले असेल तर मोदी इस्रायल-इराण युद्ध का थांबवू शकले नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला. अमेरिकेशी झालेल्या व्यापार करारामुळे भारताची स्थिती गुलामासारखी झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.