संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत तो मराठी माणसाचा पक्ष नसल्याचे म्हटले आहे. भाजपचा महाराष्ट्राची अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान आणि मराठी लोकांशी कोणताही संबंध नसल्याचे राऊत यांनी नमूद केले. त्यांच्या यादीतील परप्रांतीयांचा भरणा आश्चर्यकारक नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.