संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना अभ्यास करा असा सल्ला दिला आहे. राऊत यांनी परभणी येथील भारतीय जनता पक्षाच्या 12 मुस्लिम नगरसेवकांचे उदाहरण दिले. महाराष्ट्रात मराठी भाषिक मुस्लिम असून ते घुसखोर नाहीत, हे समजून घेण्याचे आवाहन त्यांनी शिंदेंना केले आहे.