संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीवर तीव्र टीका केली आहे. सरकारवर 9 लाख कोटींचे कर्ज असताना 31 हजार कोटी रुपये कसे उभारणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अर्थमंत्री अजित पवारांना रिकाम्या तिजोरीमुळे झोप लागत नसल्याचे राऊत म्हणाले. कर्जमाफी हा मोठा उपाय असताना सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी नमूद केले.