संजय राऊत यांनी नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पक्षाची आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाचे नियम न पाळणाऱ्या, विशेषतः मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कायदेशीर कारवाई होईल, असे ते म्हणाले. गट तयार करण्यासाठी उपस्थित नसलेल्यांवर ही कारवाई प्रभावी ठरेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले.