संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या कथित दहशतीमुळे उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, राऊत यांनी निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या एजंटप्रमाणे काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.