संजय राऊत यांना दोन वर्षांनी राज्यसभेची संधी मिळणे अवघड असल्याने ते राजकीय डावपेच खेळत आहेत. शरद पवारांना खासदारकी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असून, याद्वारे प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेची संधी कापून स्वतःचा पुढचा पत्ता सुरक्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निर्णय घेण्याचा अधिकार नसतानाही ते हे घोडे दामटत आहेत.