संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भेटींवरून जोरदार टीका केली आहे. शिंदे रुसून बसलेल्या सूनबाईंसारखे दिल्लीत फेऱ्या मारत असून, दिल्लीतील सासरे ऐकण्यास तयार नसल्याने त्यांची राजकीय अडचण झाली आहे. हे प्रकरण इज्जत का सवाल बनले असून, महायुतीमधील मतभेदांवर राऊतांनी बोट ठेवले.