संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असून, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आमचं भांडण सुरूच राहील, असे राऊत यांनी म्हटले. सध्याचे नंदनवन शिवसेनेच्या चोरीतून निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.