संजय राऊत यांनी गणेश नाईकांच्या भूमिकेला सहमती दर्शवली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत सातारा येथील अंमली पदार्थांच्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. या पैशाच्या आणि दहशतीच्या बळावर शिंदे गटाने ठाण्यात बहुमत मिळवल्याचे ते म्हणाले. नाईक गेल्या काही दिवसांपासून हेच मत मांडत आहेत.