संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या संभाव्य युतीवर भाष्य केले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तुम्ही तुमचं बघा, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटींवरून त्यांनी चंपी मालिशच्या उपमा वापरत टीका केली. इतर पक्षांतील भ्रष्टाचारी लोकांना एकत्र घेऊन सत्ताधारी काय साध्य करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.