बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी खासदार संजय राऊत यांनी स्मृतीस्थळी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या राऊत यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद टाळण्याबाबत पत्रक काढले होते. ठाकरे बंधूंच्या आगमनापूर्वीच राऊत यांनी अभिवादन केले.