मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेवर भाष्य केले. चंद्रपूरमध्ये पाठिंब्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचा महापौर होण्याच्या शक्यतेवर बोलताना, पाहू ना, होणार, असे सूचक विधान राऊत यांनी केले. परिस्थिती सुरळीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.