आमदार संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की, अंबादास दानवे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. विविध पक्षांमध्ये नेत्यांचे येणे-जाणे सुरू असताना, ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीतही घडू शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.