उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर आता कोणताही पर्याय उरलेला नाही, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसने साथ सोडल्याने आणि शरद पवारही वेगळ्या मार्गावर असल्याने, उबाठाला प्रत्येक दारी जावे लागत आहे. मनसेसोबत युती करण्याचा प्रयत्न हा याच परिस्थितीतून निर्माण झाला असून, हाच एकमेव मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.