जळगाव तालुक्यातील वावडदे येथे शेगाव जाणाऱ्या पायीवारी दिंडीचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. भाविकांच्या एरंडोल ते शेगाव पायीवारीचे हे ३६ वे वर्ष आहे. गावात संत गजानन महाराज यांच्या पालखीची आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली. ग्रामस्थांकडून वारीचे आगमन होताच आनंदाचे वातावरण होते, भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले. हे स्वागत सोहळ्याने गावकरी आणि भाविकांमध्ये उत्साह संचारला.