शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर कळंब येथे या पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण कळंब शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज कळंब शहरातच पालखीचा मुक्काम असणार आहे. यंदा या पालखीचे 57 वे वर्ष असून तब्बल 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून या पालखी सोहळ्याची ओळख आहे. टाळ मृदंगाचा गजर आणि गण गण गणात बोते च्या जय घोषात शेकडो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले असून मजल तर मजल करीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.