सफला एकादशीला मुक्ताईनगर, जळगाव येथे संत मुक्ताई वारीचा दोन दिवसीय उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. १२ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही सदगुरु झेंडूजी महाराज पुण्यतिथी वारीची परंपरा आजही भक्तीभावाने अखंड सुरू आहे. कीर्तन आणि मुक्ताई दर्शनाने वातावरण भक्तिमय झाले होते.