ज्ञानोबा-निवृत्ती'च्या जयघोषात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सिन्नर नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. शहरात आगमन झाल्यानंतर सिन्नर नगरपरिषद, विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालखीचे आणि दिंडी प्रमुखांचे जंगी स्वागत करण्यात आले.