बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन विभाग व बंजारा विरासत संघ यांचा संयुक्त उपक्रम राज्यभरातून बंजारा बांधव याठिकाणी येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री संजय राठोड सह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. संत सेवालाल महाराज समाधी ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नगारा वाजवून कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. पोहरादेवी इथे दिवसभर सेवा प्रसाद वाटप आणि धार्मिक भजन-कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या महोत्सवाची संकल्पना मंत्री संजय राठोड यांची असून पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा उद्देश ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.