बीडमधील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथे संत वामनभाऊ महाराज यांचा 94 वा नारळी सप्ताह सुरु आहे. या सप्ताहाचं आयोजन म्हसोबाची वाडी इथे करण्यात आलंय. या सप्ताहात भक्तांसाठी 25 क्विंटल गुलाबजामुनचा महाप्रसाद ठेवण्यात आला.