मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर कार्यकर्ते संतोष धुरी आज दुपारी एक वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांचा हा पक्षप्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.