पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम भागातील, हातानोशी गावातल्या संतोष थोपटे या तरुण शेतकऱ्याने,पारंपरिक शेतीला फाटा देत, गुलाब आणि आस्टरच्या फुलांची यशस्वी शेती केली. पारंपरिक पिकांसोबत त्यांच्याकडे असलेल्या 2 एकर क्षेत्रात फुलांची यशस्वी शेती करून वर्षाकाठी लाखोंच उप्तन्न घेतायत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत केलेल्या या शेतातील फुलांना बाजारात किलोवर आणि गड्डीला चांगला भाव मिळतं असल्यानं, वर्षाला 7 ते 8 लाख रुपयांच त्यांना यातून उप्तन्न मिळतंय. शेतात वेगवेगळे प्रयोग करून पीक घेण्याचे धाडसं करून थोपटे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीयं..शेती करू इच्छिणारा तरुण वर्ग यामुळं प्रोत्साहीत होतोय.