सप्तश्रृंगी गडावरील अपघातांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या निकृष्ट रस्ता कामामुळे भाविकांना मोठ्या अडचणी येत असून अपघात वाढत आहेत. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी अपघातस्थळी रस्ता रोको आंदोलन केले आहे. बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा आरोप करत, सुरक्षित प्रवासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.