2025 या सरत्या वर्षाला निरोप देत 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच लाखो भाविकांनी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावली. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, आजपासून पुढील तीन दिवस मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.