अश्वांची पंढरी असलेल्या नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. देशभरातील घोडे बाजारात दाखल झाले असून, १५ कोटींच्या 'ब्रह्मोस'सह इतर जातिवंत अश्वांनी लक्ष वेधले. यंदाच्या बाजारात ३ कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे.