नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी, त्यांनी मिलिंद नार्वेकर यांचीही भेट घेतली होती. म्हस्के यांनी आपण देवदर्शनाला गेल्याचे आणि मोबाईल बंद असल्याने संपर्कात नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पक्षाने त्यांना सुरक्षिततेसाठी थेट संपर्कात येईपर्यंत काही न बोलण्याचा सल्ला दिला होता.