सातारा तालुक्यातील लिंब येथे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने 'उदयनराजे केसरी' भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांच्यावतीने ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. यासाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावर्षी पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत 1 लाख 51 हजार 7 रुपये या प्रथम क्रमांकाचे बक्षीस बकासुर आणि बादल या बैल जोडीला मिळाले आहे.यावेळी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जिल्हासह पर जिल्ह्यातून बैलगाडा शौकिनांची गर्दी पाहायला मिळाली. या बैलगाडा शर्यतीचे ड्रोन द्वारे घेतलेली खासदृश्य