साताऱ्यात पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शेकडो बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे सैनिक स्कूल मैदान परिसरात भव्य तयारी केली होती.