सातारा तालुक्यातील सासपडे गावामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या म्हैशीला युवकांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. सासपडे गावामध्ये 40 फूट खोल असलेल्या एका विहिरीमध्ये म्हैस पडली होती. म्हैस पडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान क्रेनच्या सहाय्याने अब्दुल सुतार व सोहेल सुतार यांनी अथक परिश्रम करत विहिरीमध्ये उतरून क्रेनच्या साह्याने म्हैशीला जीवदान देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य मिळाले.