कोयनानगर परिसर व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओझर्डे/नवजा धबधबा ओसांडून वाहत आहे. धबधबा व कोयनानगर परिसरातील पाऊसाळी निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. ओझर्डे धबधब्यासह कोयना परिसरातील धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा यामधुन अनेक छोटे-मोठे धबधबे वाहू लागले आहेत याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.