सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. कण्हेर धरण ९३ टक्के भरले असून चारही दरवाजे उघडत ५ हजार क्युसेकने वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण ७३ टीएमसीवर पोहोचले आहे.