यशाची आणि प्रसिद्धीची शिखरे गाठल्यानंतरही अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मातीशी आणि जुन्या नात्यांशी असलेली जवळीक आजही कायम ठेवली आहे. कामाच्या धावपळीमुळे यापूर्वी बऱ्याचदा त्यांना बहिणींना फक्त फोनवरूनच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्याव्या लागत असत.मात्र,यावर्षी त्यांनी आवर्जून वेळ काढीत बहिणींना सुखद धक्का दिला.भावाच्या या सरप्राईज भेटीमुळे तिन्ही बहिणींनी कमालीचे समाधान व्यक्त केले आहे.